फिजिक्स या विषयाबद्दल आज शैक्षणिक क्षेत्रात अनेक गैरसमज आहेत. बरेच विद्यार्थी व त्यांचे ऐकून काही पालक या विषयास अत्यंत कठीण विषय मानतात हे आपण समजू शकतो, परंतु बरेच शिक्षकदेखील या विषयास कठीण विषय संबोधतात हे मात्र चुकीचे. हा विषय कठीण नसून थोडा जास्त सरावाचा आहे इतके नक्की. सायन्स शिकण्याकरीता विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन असावा लागतो. असेच विद्यार्थी सायन्स आणि पर्यायाने फिजिक्स चांगले शिकू शकतात.
या विषयाची बौद्धिक गरज इतर विषयांपेक्षा भिन्न आहे हे मात्र निश्चित. लहानपणापासूनच आपण बल ही संकल्पना शिकत असतो परंतु इयत्तेनुसार या संकल्पनेची व्याख्या बदलत जाते. म्हणून ११ वी , १२ वीच्या विद्यार्थ्यांना एखाद्या संकल्पनेचे ज्ञान खालील इयत्तापासून माहीत असणे आवश्यक आहे. या विषयात केवळ व्याख्या पाठ असून चालत नाहीतर त्यांचे आर्थ स्पष्ट करतायेणे, त्यांचा इतर ठिकाणी वापर करता येणे हे अपेक्षित आहे.
हा विषय केवळ त्यालाच सोपा वाटू शकतो ज्याला चांगली आकलन क्षमता, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती आहे. जो विद्यार्थी आपल्या एकूण अभ्यासातील निम्मा वेळ या विषयाकरिता देतो, २ वर्षे सातत्याने या विषयाचा आलेख चढता ठेवू शकतो, या विषयाच्या आभ्यासाशिवाय दुसरा पर्यायच नाही हे ज्याला माहित आहे तोच विद्यार्थी कोणतीही प्रवेष परीक्षा यशस्वी होवू शकतो हे निश्चित.
मी कुमारी गायत्री परताणी, १२वी च्या NEET या मेडिकलच्या ऑल इंडिया परीक्षेत २०१३ मध्ये चांगले गुण मिळवून आज MBBS करीत आहे. ह्यात माझे गुरु श्री. प्रशांत पाटील सरांच्या मार्गदर्शनाचा बहुमोल वाटा आहे. मी चांगला अभ्यास केला व मला पाटील सरांचे मोलाचे मार्गदर्शन केले म्हणूनच माझा चांगला निकाल आला. म्हणूनच आज मी MBBS करीत आहे.
आदरणीय पाटील सर, तुमच्या बद्दल लिहितांना काहीकाळ का होईना शब्द हरले, लेखणी थांबली. तुम्ही भौतीकशास्त्राचे सारस्वत आहात. ११वी ला पहिल्यांदा जेव्हा वर्गात आले तेव्हा मात्र मनात भीती होतीच पण काही काळाने तुम्ही आम्हाला पाण्याच्या ओघाप्रमाणे कसे सामावून घेतले काही कळालेच नाही. पण एवढे मात्र नक्की तुमच्या शिकवणीत आल्यास मनातून चांगले वाटते.
परभणीत फिजिक्स विषयाचे प्रा. प्रशांत पाटील यांनी शैक्षणिक कार्यातून मुलांचे उज्वल भविष्य घडविण्याचे कार्य केले आहे. फिजिक्स सारखा अवघड विषय सोपा करून सांगण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. प्रामुख्याने problems सर चांगल्या प्रकारे समजावून सांगतात व भरपूर सराव करून घेतात. सरांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पाल्याने देखील चांगले गुण घेतले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
माझ्यामते पाटील सर ज्ञानासोबतच संस्काराचेही धडे देतात. पाटील सर विद्यार्थ्यांसोबत मित्रा प्रमाणे वागतात. म्हणून विद्यार्थीदेखील त्यांच्याशी संवाद साधतात व त्यांच्या अडचणी सरांना सांगतात.